Posts

Showing posts from 2016

द्विराष्ट्रवादापासून फाळणीपर्यंत

हिंदू   व   मुसलमान   हे   एकाच   देशातील   दोन   राष्ट्रे  ( कौम )  आहेत ,  असे   म्हणणे   सर   सय्यद   अहमद   यांनी   १८८७ सालापासूनच   मांडले   होते .  त्याआधारे   सत्तेत   प्रतिनिधित्वाच्या   मागण्या   झाल्या ;  पण   फाळणीची   मागणी   १९४० सालीच   प्रथम   झाली .. धर्म-पंथ-जातनिरपेक्षपणे सर्वाना समान हक्क देणारे सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याचे काँग्रेसचे तिच्या स्थापनेपासूनचे उदात्त ध्येय सहज साध्य होणारे नव्हते. त्या स्वतंत्र राज्यातील सत्तेत आम्हाला किती वाटा मिळणार, असे प्रश्न उपस्थित करून काही वर्ग काँग्रेसविरोधात उभे ठाकले. यापैकी एक वर्ग हिंदू समाजातील ब्राह्मणेतरांचा होता. आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात तो वाटा मिळावा असे या वर्गाला वाटत होते. त्यातील काही गटांनी आपल्याला विधिमंडळात मिळणारा राखीव वाटा स्वतंत्र मतदारसंघामार्फत (म्हणजे त्या जाती प्रतिनिधी त्याच जातीच्या मतदारांनी निवडण्याची पद्धत) मिळावा, अशीही मागणी केली होती. तथापि, या वर्गाचे समाधान करून भारताची राज्यघटना त्यांना स्वीकारण्यास लावण्यात काँग्रेसला यश मिळाले. काँग्रेसच्या वरील ध्येयाला विरोध करणारा दुसरा व

दक्षिणेच्या राजाने सम्राट हर्षवर्धनचा पराभव केला होता

Image
दक्षिणेच्या राजाने सम्राट हर्षवर्धनाचा पराभव केला होता , हा इतिहासातील एक प्रसंग ताम्रपटाच्या पुराव्याआधारे प्रकाशामध्ये आला आहे . ही ऐतिहासिक लढाईजिंकून परत येताना पुलकेशी द्वितीय राजाने औरंगाबादजवळच्या पैठण परिसरातील ब्राह्मणवटवीय म्हणजेच ब्राह्मणगाव आणि वडवाळी या दोन गावांतील जमीन नागशर्मा नावाच्या विद्वानाला या ताम्रपटाद्वारे दिली होती . या ताम्रपटातील उल्लेखावरून सम्राट हर्षवर्धनाचा पराभव करून बदामीला परत येताना गोदावरीच्या तीरी पुलकेशी राजाने हे दान दिल्याचे स्पष्ट होते . भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे प्रबंधक श्रीनंद बापट यांनी या ताम्रपटाचे संशोधन करून वाचन केले . ही माहिती देणारा ताम्रपट बापट आणि इतिहासाचे अभ्यासक प्रदीप सोहोनी यांना मुंबई येथील नाणेसंग्राहक रघुवीर पै यांच्याकडून प्राप्त झाला . कनौजचा बलाढय़ सम्राट हर्षवर्धन याचा पराभव बदामी ( जि . बागलकोट ) येथील चालुक्य नृपती द्वितीय पुलकेशी याने इसवी सन ६१८ - १९ च्या हिवाळ्यातच केला होता , अशी माहिती या ता

शोधगाथा : महाभारताचा भाषाशास्त्रीय ताळा

हडप्पा संस्कृतीतील उत्तरकालीन दफनकुंभावर चित्रित केलेले मोर एवढय़ा एकाच संदर्भावरून त्याआधीच्या काळात आर्याच्या जीवनात कोणकोणत्या घडामोडी घडलेल्या असाव्यात याचा अंदाज बांधता येतो . त्या सगळ्याचा महाभारत काळाशी काही संबंध आहे का , याचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे . पुणे विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या आर्यविषयक एका परिसंवादामध्ये काही वर्षांपूर्वी मी सहभागी झालो होतो .  ‘ हडप्पा संस्कृतीच्या उत्तरकालीन दफनकुंभावर चित्रित केलेले मोर ’ या विषयावर तिथे संशोधनात्मक सादरीकरण केले होते . हा विषय एका अर्थाने नवीन नव्हता . कारण त्यावर सर्वप्रथम डॉ . दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी एक लेख लिहिला होता . त्यापाठोपाठ डॉ . मधुकर केशव ढवळीकर यांनी विषयाचे महत्त्व जाणून भाष्य केले . डॉ . कोसंबी यांना हा विषय एकदम वेगळा वाटला . कारण दफनकुंभावरील मोरांच्या चित्रणामुळे त्यांना महाभारतात वर्णिलेल्या एका प्रसंगाची व त्यातील तपशिलांची त्यांना आठवण झाली . इंद्रपत्नी शचिशी करावयाच्या