Posts

Showing posts from February, 2016

कथा.. पानिपतच्या मराठा यद्धकैद्यांची!

Image
पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वषेर्ं उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, तसेच स्त्रिया व पुरुष मरण पावले आणि २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबच लाब रांगा केल्या गेल्या व त्यांना अफगाण सन्याबरोबर दिल्ली, मथुरा इत्यादी ठिकाणी नेण्यात आले. इतिहासात पानिपतच्या या दुर्दैवी युद्धकैद्यांविषयी जे थोडेफार उल्लेख आढळतात त्यापकी एक उल्लेख सियार उल मुत्ताखिरीन या इतिहासकाराने अशा तऱ्हेने वर्णन केलेला आहे : ‘दु:खी युद्धकैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडेबहुत र्अधकच्चे अन्न व पाणी देण्यात आले. युद्ध संपल्यावर जे काही पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले. अंदाजे बावीस हजार. त्यातले बरेचसे लोक मोठय़ा हुद्दय़ावरचे होते. पानिपतचे युद्ध कसे लढले गेले याविषयी इतिहासात सविस्तर माहिती उपलब्ध आहे; परंतु त्यानंतर मराठी युद्धकैद्यांचे पुढे काय झाले याविषयी काहीच माहिती उपलब्ध न