दक्षिणेच्या राजाने सम्राट हर्षवर्धनचा पराभव केला होता
दक्षिणेच्या राजाने सम्राट हर्षवर्धनाचा पराभव केला होता , हा इतिहासातील एक प्रसंग ताम्रपटाच्या पुराव्याआधारे प्रकाशामध्ये आला आहे . ही ऐतिहासिक लढाईजिंकून परत येताना पुलकेशी द्वितीय राजाने औरंगाबादजवळच्या पैठण परिसरातील ब्राह्मणवटवीय म्हणजेच ब्राह्मणगाव आणि वडवाळी या दोन गावांतील जमीन नागशर्मा नावाच्या विद्वानाला या ताम्रपटाद्वारे दिली होती . या ताम्रपटातील उल्लेखावरून सम्राट हर्षवर्धनाचा पराभव करून बदामीला परत येताना गोदावरीच्या तीरी पुलकेशी राजाने हे दान दिल्याचे स्पष्ट होते . भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे प्रबंधक श्रीनंद बापट यांनी या ताम्रपटाचे संशोधन करून वाचन केले . ही माहिती देणारा ताम्रपट बापट आणि इतिहासाचे अभ्यासक प्रदीप सोहोनी यांना मुंबई येथील नाणेसंग्राहक रघुवीर पै यांच्याकडून प्राप्त झाला . कनौजचा बलाढय़ सम्राट हर्षवर्धन याचा पराभव बदामी ( जि . बागलकोट ) येथील चालुक्य नृपती द्वितीय पुलकेशी याने इसवी सन ६१८ - १९ च्या हिवाळ्यातच केला होता , अशी माहिती या ता